पोलीसांना या दिवाळीला प्रोत्साहन भत्ता द्या.

1 min read

पोलीसांना या दिवाळीला प्रोत्साहन भत्ता द्या.

कोरोनाच्या या संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांनी आपलं कर्तव्य स्वतःच घरदार परीवार सोडून बजावलं.

सुमित दंडुके/औरंगाबाद: या दिवाळीला पोलीसांना प्रोत्साहन भत्ता द्या. या मागणीचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनचे राज्य सरचिटणीस विकास सुसर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल व पत्राद्वारे पाठवले आहे.
WhatsApp-Image-2020-10-06-at-12.42.16-PM
(कोविड १९) कोरोनाच्या या संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांनी आपलं कर्तव्य स्वतःच घरदार परीवार सोडून बजावलं आहे. त्यांच्या त्यागाला आपण न्याय द्यावा. आपल्या साठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव यांनाही प्रोत्साहन भत्ता म्हणून कमीत कमी दोन महिन्याचा पगार द्यावा. अशी मागणी समस्त पोलीस बॉईज असोसिएशन व संघटनेचे अध्यक्ष रवी वैद्य यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.