शहीदांना श्रद्धांजली वाहून पोलीस हुतात्मा दिन साजरा

शहीदांना श्रद्धांजली वाहून पोलीस हुतात्मा दिन साजरा

औरंगाबाद : पोलीस हुतात्मा दिन औरंगाबादमध्ये साजरा करण्यात आला. शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण यावेळी करण्यात आले. शहरातील पोलीस मुख्यालयात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम सकाळी ७ वाजता पार पडला.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या २१ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते. औरंगाबाद शहरातील पोलीस मुख्यालयात देखील हा कार्यक्रम पार पडला. शहीदांना पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, खा.इम्तियाज जलील, नंदकुमार घोडेले, बापू घडामोडे यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थीत होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.