५० हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक  अटकेत.

1 min read

५० हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अटकेत.

सिटीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद.दि.२२ : शहरातील सिटीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार यांच्या फिर्यादीनुसार एका गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून नाव न घेण्यासाठी उपनिरीक्षक संतोष पाटे यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी केली.

पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे 

त्यामुळे तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार दि.२१ रोजी सापळा रचून उपनिरीक्षक संतोष पाटे(वय.३०, रा.पडेगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक संदीप राजपूत आणि सहकाऱ्यानी पार पाडली.