५०० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

६६ ग्रामपंचायती बिनविरोध...

५०० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

विजय कुलकर्णी /परभणी : जिल्ह्यातील एकुण ५६६ ग्रामपंचातीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या ५०० ग्रामपंचातीसाठी मतदान होणार आहे. यातील ६६ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.

एप्रिल ते डिसेंंबर २०२० या कालावधीत या निवडणुका होणार होत्या. परंतु कोव्हिड-१९ च्या साथीमुळे या निवडणुका आता घेतल्या जात आहेत. या निवडणुकीत एकुण ९ हजार ५ उमेदवार रिंगणात आहेत. तर ६ लाख ९६ हजार ८६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष मतदार ३ लाख ६४ हजार २२६ तर ३ लाख ३३ हजार ४६२ महिला मतदारांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायंतीसाठी १५७३ मतदान केंद्रे आहेत. एका केंद्रांवर ४ अधिकारी व एक पोलीस कर्मचारी असे ७ हजार ८६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी गावागावांमधील उमेदवारही सज्ज झाले आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी मतदान केंद्रांवर हजर होणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.