पॉर्न शुटींग प्रकरणात राज कुंद्राला अटक

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल

पॉर्न शुटींग प्रकरणात राज कुंद्राला अटक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसाईक असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री 11 वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही वाईट अनुभव आल्याचे सांगितले आहे.

राज कुंद्रावर पॉर्नोग्राफिक फिल्म बनवणे आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

कसा झाला पोल-खोल?
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि अन्य काही लोकांविरोधात एका महिलेने मुंबई पोलिसांकडे या संबंधी एक गुन्हा दाखल केला होता. राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांनी वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी ऑफर दिली आणि जबरदस्तीने पॉर्न चित्रपट बनवले असा आरोप त्या महिलेने केला आहे. या पॉर्न रॅकेटचा मास्टरमाईंड हा राज कुंद्रा आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.