पोषण अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्य़ातील अंगणवाडी केंद्रात परसबागांची निर्मिती

1 min read

पोषण अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्य़ातील अंगणवाडी केंद्रात परसबागांची निर्मिती

हिंगोली जिल्ह्याने पोषण अभियानात मागील काही वर्षांत उत्कृष्ट काम केल्यामुळे सलग दोन वर्षे जिल्हयास राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण श्री. गणेश वाघ, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीमती रुपालीताई पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्य़ातील प्रत्येक बिटस्तरावर एक याप्रमाणे 39 अंगणवाडी केंद्रात परसबाग तयार करण्याचे नियोजन झाले आहे. त्यापैकी बहुतांश अंगणवाडी केंद्रात परसबाग तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लाॅकडाऊनची परिस्थिती असताना ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका मदतनीस गाव स्तरावर कोरोना बाबत जनजागृती, बालकांची आरोग्य तपासणी, विविध सर्वे,घरपोच आहार वाटप, लसिकरण यासारखे कामे करत आहेत. या कामांच्या व्यस्ततेतुन वेळ काढून परसबाग तयार करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्याने पोषण अभियानात मागील काही वर्षांत उत्कृष्ट काम केल्यामुळे सलग दोन वर्षे जिल्हयास राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी सुद्धा विभागाने पोषण अभियानात काम सुरू केले आहे.