कोरोना संसर्ग वाढीची शक्यता, यंत्रणांनी सज्ज रहावे

1 min read

कोरोना संसर्ग वाढीची शक्यता, यंत्रणांनी सज्ज रहावे

दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढू लागली असून कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यंत्रणांना सज्जतेचे आदेश दिले आहेत.

सुमित दंडुके / औरंगाबाद : कोविड-19 च्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर चाचण्यांचे आणि जनजागृतीचे प्रमाण वाढवावे तसेच जिल्ह्यातील कोवीडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोवीडसाठी वाढवण्यात आलेल्या सर्व आरोग्य उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने जानेवारी पर्यंत सुरू ठेवण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालय,मनपा, जिल्हा परिषद कार्यालय येथे येणाऱ्या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात करावी. मनपाने कोरोना तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेत आढळून आलेल्या विविध आजारांची लक्षणे असलेल्यांचा रूग्ण निहाय पाठपुरावा करून अद्ययावत माहिती ठेवावी. जिल्ह्यातील संसर्गचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत.त्यादृष्टीने आरोग्य तपासण्यांसाठी सर्वांनी नियोजन करून तपासणी शिबिरे आयोजित करावीत.कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवावे, त्याचा सर्व समन्वय घाटीतून केल्या जाईल. तसेच जिल्हयात लिक्वीड ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाने संबंधिताकडे पाठपुरावा करून निर्मिती सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.त्याचप्रमाणे संसर्ग वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांनी विभागीय आयुक्त यांच्या निर्दैशानुसार वाढीव खाटांची तयारी ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
dio2
तसेच रेमडीसीवीरची पुरेशी उपलब्धता ठेवण्यासाठी घाटी, मनपा, जिल्हा रुग्णालय यांनी समन्वय ठेवून इंजेक्शन उपलब्ध ठेवावे. कोवीड उपचार पद्धती बाबतचे प्रशिक्षण डॉक्टर, नर्सेस, यांच्या सह पॅरामेडीकल स्टाफला देण्याचे नियोजन घाटीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. मनपातर्फे कोमॉर्बिड रूग्ण देखरेख सुरू असून कोरोनातून बरे झालेल्यानांही संपर्क साधून आरोग्या बाबत विचारपूस केली जात असल्याचे मनपा आयुक्त आस्तिक पांडेय यांनी यावेळी सांगितले.