'OH MY GOD-2'चे पोस्टर प्रदर्शित

'OH MY GOD-2'चे पोस्टर प्रदर्शित

मुंबई- अक्षय कुमारच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल साकारला जाणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात अक्षय कुमारचा हटके लूक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’ च्या शूटींगलाही सुरुवात केली आहे.अक्षय कुमारनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.


अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टरवरुन अक्षय कुमार ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये भगवान श्री शंकराचे रुप साकारणार आहे. अक्षयने या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. यातील एका पोस्टरमध्ये देवाने एका भक्ताचा हात पकडल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार स्वत: श्री शंकराच्या रुपात पाहायला मिळत आहे. अक्षयने शेअर केलेल्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. “रख विश्वास, तू है शिव का दास”, असा संदेश या पोस्टरवर लिहिलेला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.