स्वप्नील कुमावत: तणावाखाली काम करणार-या सर्व लोकांसाठी,अधिका-यांसाठी योग आणि प्राणायाम करणे चांगले आहे. जर आपण मनापासून काही केले तर आपल्याला नेहमीच फायदा होतो. आपण नियमित योग आणि प्राणायम केलं तर कधीही ताणतणाव येणार नाही. हैदराबादमध्ये असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत आयपीएस प्रोबेशनरच्या ‘दीक्षांत परेड’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुण आयपीएस अधिका-यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित होते. मी माझ्या कार्यकाळात नक्कीच तुम्हाला भेटेन असही मोदी म्हणाले. परंतु यावर्षी कोरोनामुळे मी आपणा सर्वांना भेटण्यास असमर्थ आहे. पण मला खात्री आहे की माझ्या कारकिर्दीत मी नक्कीच कधीतरी तुम्हाला भेटेन.
पंतप्रधान म्हणाले, कोरोना साथीच्या काळात पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे, खाकीवर्दीच्या मानवी चेह-यांचे चित्र जनतेने पाहिले आहे. अशा प्रकारे खाकीवर्दीवर लोकांचा आत्मविश्वास वाढेल. आपल्या गणवेशाचा फायद्याऐवजी आपल्या गणवेशाचा अभिमान बाळगणे फार महत्वाचे आहे. तुमच्या खाकी गणवेशाबद्दल तुम्ही लोकांचा कधीही आदर गमावू नये.
तणाव मुक्तीसाठी प्राणायाम करा पंतप्रधान मोदींचा आयपीएस अधिकाऱ्यांना सल्ला
कोरोनामुळे मी आपणा सर्वांना भेटण्यास असमर्थ आहे. पण मला खात्री आहे की माझ्या कारकिर्दीत मी नक्कीच कधीतरी तुम्हाला भेटेन.

Loading...