राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

27 मार्चपासून होते एम्समध्ये दाखल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून याबाबत ही माहिती दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंगळवारी दिल्लीतील एम्स येथे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.(President Ramnath Kovind's bypass surgery successful) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून याबाबत ही माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,मंगळवारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया दिल्लीच्या एम्स येथे यशस्वीरित्या पार पडली आहे.मी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो. एम्सच्या संचालकाशी संवाद साधून राष्ट्रपती कोविंद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या तंदुरुस्तीसाठी आणि त्वरित पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. असं ट्विट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

26 मार्च शुक्रवारी राष्ट्रपती कोविंद यांच्या छातीत दुखल्यामुळे त्यांना दैंनदिन आरोग्य तपासणीसाठी दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथे नेण्यात आले. जिथे त्यांचा रुटीन चेकअप झाला, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी एम्स मध्ये पाठविले. 27 मार्च रोजी दुपारी राष्ट्रपतीं रामनाथ कोंविद यांना एम्समध्ये हलविण्यात आले होते. आज दि.30 रोजी मंगळवारी दिल्लीतील एम्स येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.