पंतप्रधान मोदींनी वाढवले भारतीय पुरुष हॉकी संघाचे मनोबल

पराभव आणि विजय हा जीवनाचा भाग -नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी वाढवले भारतीय पुरुष हॉकी संघाचे मनोबल

टोकीयो ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून पराभव झाला. 5-2 अशा फरकाने पराभव झाला आणि वर्णपदकाचे स्वप्नही तुटले. भारत अजूनही कांस्य पदक पटकावू शकतो. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचं कौतुक करत त्यांचे मनोबल उंचावले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पराभूत होणे किंवा विजय मिळवणे हा खेळाचा भाग आहे. पुढे बोलताना ते हेदेखील म्हणाले की, देशाला सर्व खेळाडूंवर गर्व आहे.

1980 नंतर पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याची हॉकी संघाला असलेली संधी यंदातरी हातातून निसटली आहे, भारतीय संघाच फायनल्स गाठण्याचे स्वप्न भंगले असले तरिही, कांस्य पदकासाठी भारतीय संघ दुसऱ्या सेमी फायनल्समध्ये पराभव झालेल्या संघासोबत लढणार आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की,"पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा आहे. टोकियो 2020 मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघाने आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे."

सेमीफायनलच्या सामन्यानंतर मोदींनी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराशी बातचीत केली. त्यांनी पूर्ण टूर्नामेंट चांगले प्रदर्शन केल्याबद्दल संघाच अभिनंदन करत पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. याआधी सामना सुरु असताना पीएम मोदी यांनी एक ट्विट केले होते, ‘मी भारत आणि बेल्जियम हॉकी पुरुष सेमीफायनल पाहत आहे. मला आपल्या संघावर गर्व आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा’.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.