औरंगाबाद, पुणे, नांदेडला जाणाऱ्या खासगी बस आता बंद

२३ तारखेपर्यंत बस वाहतुक बंद

औरंगाबाद, पुणे, नांदेडला जाणाऱ्या खासगी बस आता बंद

परभणी : नांदेड, औरंगाबाद व पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे परभणीहुन यागावी जाणाऱ्या एसटी महामंडळाची बससेवा १६ ते २३ मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, मुंबई, पुण्याकडील खासगी बस वाहतुकीलाही यादरम्यान प्रतिबंध केला आहे. मागील काही दिवसात परभणी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील वाहतुकीस ३१ मार्चपर्यंत यापुर्वीच प्रतिबंध करण्यात आला आहे. विदर्भाप्रमाणेच नांदेड व औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने परभणीहून नांदेड व औरंगाबादकडे ये-जा करणारी एसटी महामंडळाची बस सेवा १६ ते २३ मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.

त्याबरोबरच पुणे व मुंबईला जाणार्‍या खासगी बसेसही १६ ते २३ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. या प्रतिबंधातून पूर्वपरवानगीने अत्यावश्यक सेवेस सूट देण्यात येण्याचेही आदेशात नमूद केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.