प्रियकर दिसताच वधूने दिला लग्नास नकार

1 min read

प्रियकर दिसताच वधूने दिला लग्नास नकार

वराने मंगळसूत्र बांधण्यापूर्वी वधूने लग्नाची इच्छा नाही असे सांगून सर्वांना चकित केले.

एखाद्या चिञपटात जसे घडते तसाच काहीसा प्रकार तेलंगणातील वनपर्ती जिल्ह्यातील चरलापल्ला गावात घडला आहे. लग्नाच्या विधी चालू होत्या. वराने मंगळसूत्र बांधण्यापूर्वी वधूने लग्नाची इच्छा नाही असे सांगून सर्वांना चकित केले. नातेवाईकांनी वधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही, त्यानंतर वधू हॉलच्या बाहेर गेली.

रिपोर्टनुसार वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तिने लग्नात तिचा माजी प्रियकर पाहिला आणि त्यानंतर तिने हे पाऊल उचलले. लग्नातील एका पाहुण्याने सांगितले की आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही.