परळीत गुंडाराज सुरू

1 min read

परळीत गुंडाराज सुरू

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने परळीत एका व्यापा-याला प्रचंड मारहाण केली आहे. भर दुपारी गर्दीच्या ठिकाणी घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

परळी प्रतिनिधीःपरळी शहरात सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मालमत्तेच्या वादातून एका व्यापाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काठी आणि रॉडने मारहाण केली.  मारहाण करणारा गणेश कराड हा व्यक्ती धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. गणेश कराडवर गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाणीचा प्रकार बाजारपेठीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर जखमी अमर देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परळी शहरातील टॉवर परिसरात सोमवारी भर दुपारी बारा वाजता व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. व्यापारी अमर देशमुख यांना गणेश कराड आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी काठी आणि रॉडने मारहाण केली. अमर देशमुख हे मूळचे पुण्याचे आहेत. मालमत्तेच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.

अमर देशमुख यांना ५ते ६ जण मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. आरोपी गणेश कराड हा सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे.

अमर देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर गणेश कराडसह इतर चार जणांवर संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०७ अंतर्गत मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.  सर्व आरोपी फरार आहेत. गणेश कराड, शाम कराड, लाला कराड, रमेश गीते आणि मंचक गीते अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.