लॉकडाऊनचा निषेध, व्यापाऱ्यांचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन

औरंगाबादेत सिडको व्यापारी संघटनातर्फे चिस्तिया चौक तेे बळीराम पाटील शाळेच्या रोडवर फलक हातात घेऊन आंदोलन...

लॉकडाऊनचा निषेध, व्यापाऱ्यांचे गांधीगिरी स्टाईल आंदोलन

सुमित दंडुके/औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' च्या अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसायांना बंदी घालण्यात आलेली आहे. ज्यामुळे इतर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याच्याच निषेधार्थ आज सकाळी सिडको व्यापारी संघटनातर्फे चिस्तिया चौक तेे बळीराम पाटील शाळेच्या रोडवर 'गांधीगिरी स्टाईल' आंदोलन करण्यात आले.
WhatsApp-Image-2021-04-07-at-11.58.50-AM
या आंदोलनात व्यापाऱ्यांनी कुठलेही नियम न मोडता सोशल डिस्टंन्सिंगचे पालन आणि मास्क परिधान केले होते. विविध घोषणा लिहीलेले फलक व्यापाऱ्यांनी हातात पकडले होते. त्यावर 'लॉकडाऊनचा विरोध', 'दुकान भाडे वीज बील माफ करा', 'लॉकडाऊन रद्द करा' असे लिहीलेले होते. हे फलक जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना दाखवत व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केले.

लॉकडाऊन जरी असले तरी आम्हाला दुकान भाडे भरावेच लागणार आहे, कामगारांची पेमेंट करावीच लागणार आहे. यासाठी पैसै आणायचे कुठुन असा संतप्त सवालही यावेळी या व्यापाऱ्यांकडुन विचारण्यात आला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.