निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे तीव्र धरणे! तहसीलदारांना बोलावून दिली सोयाबीन ची पेंडी भेट.

1 min read

निलंगा तहसील कार्यालयासमोर मनसेचे तीव्र धरणे! तहसीलदारांना बोलावून दिली सोयाबीन ची पेंडी भेट.

नुकसानग्रस्त पिकांचा ताबडतोब पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

लातूर: निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन पीकावरती नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. कारण अनेक ठिकाणी सोयाबीन माजले आहे. परंतु वांझोटे ठरुन त्याला अतिषय कमी शेंगाची लागण झाली आहे. त्यातच सोयाबीन वर किड्यांचा संसर्ग होऊन करप्या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने ताबडतोब अशा सोयाबीन चे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे देत तहसीलदारांकडे केली.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे, परंतु बोगस बियाणे बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले. सुदैवाने पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे सोयाबीन चांगले आले असताना. ते सोयाबिन माजले. त्यातच करप्या,कीड लागून सोयाबीन ची पाने अनेक ठिकाणी गळून गेली ते वाळले. सोयाबीनच्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक व्यवहार चालतात.नेमके तेच पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच मूग,उडीद ही सुद्धा खरिपाची पिके, या वर्षी शेतकऱ्याच्या हाताला लागली नाहीत. त्याचे मोठे नुकसान झाले.बोगस बियाणे बाजारात आणलेल्या शासनाने किमान आता तरी अशा शेतकऱ्यांचे पंचनामे ताबडतोब करावे. या साठी मनसे कार्यकर्त्यांनी निलंगा तहसील समोर तीव्र धरणे धरले व तिथेच तहसीलदारांना बोलवून सोयाबीन ची पेंडी भेट दिली.
WhatsApp-Image-2020-09-02-at-6.03.24-PM
शासनाने विमा कंपन्यांकडून व स्वतः मदत जाहीर करून. शेतकऱ्यांना तात्काळ आधार देणे गरजेचे आहे. हे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल. असा इशारा डॉ.नरसिंह भिकाणे यांनी दिला.या आंदोलनात तालुकाध्यक्ष सूरज पटेल,शहराध्यक्ष प्रदीप शेळके,नजीर मुजावर,यश भिकाणे,अरबाज पठाण,जीवन धोत्रे,नारायण कोकरे,सुदर्शन काळे,पावन काळे,विनोद जेकाकुरे,शाफिक शेख आदी उपस्थित होते.