विजय देशमुख/निटूर: परतीच्या पावसाने निलंगा तालूक्यात धुमाकूळ घातला एका राञीत होत्याचे नव्हते केले. अनेक शेतक-यांची पिके जमिनीसह वाहून गेले. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला.
अतिवृष्टी झाल्यानंतर तालूक्यामध्ये पाहणीसाठी अक्षरशः मंत्र्यांचा पूर आला होता. त्यामुळे काहीतरी मोठी अर्थिक मदत मिळेल या आशेवर शेतकरी होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचे पॕकेज जाहीर केले , त्यामध्ये शेतकऱ्यांना कांहीही मिळणार नाही अशी भावना शेतक-यामध्ये झाली आहे म्हणून आता सरकारच्या पॕकेजचा निषेध आता ग्रामीण भागात होत आहे.
शासनाने केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याच्या भावना व्यक्त करत ग्रामीण भागातील महिलांनी फलक फडकावून सरकारचा निषेध नोंदवला...
पॅकेजचा निषेध; तोंडाला पाने पुसल्याची शेतकऱ्यांची भावना...
ग्रामीण भागातील महिलांनी फलक फडकावून सरकारचा निषेध नोंदवला...

Loading...