शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा, 
 शिवसेनेची मागणी

1 min read

शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा, शिवसेनेची मागणी

सोनपेठ तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ: गेल्या काही दिवसांपासून सोनपेठ तालुक्यात  मोठ्या  प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या  कापूस, सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.  सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी सोनपेठ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सोनपेठ तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने कापूस तसेच सोयाबीन या प्रमुख नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.
तसेच तालुक्यातील गोदावरीला पाणी आल्यामुळे गोदकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचेही  मोठे नुकसान झाले आहे.
या सर्व गंभीर बाबीचा विचार करून महसूल तसेच कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत.शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना तात्काळ विमा लागू करावा. या मागणीचे निवेदन सोनपेठ तालुका शिवसेनेच्या वतीने सोनपेठ तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांना दि. २१ रोजी देण्यात आले.
निवेदनावर उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, शहरप्रमुख कृष्णा पिंगळे, भगवान पायघन, सरपंच अमर नागुरे, माणिक तेलभरे, युवासेनेचे रामेश्वर मोकाशे जनार्धन झिरपे आदींची उपस्थिती होती.