भारतात पबजी बंद, कंपनीचे इतक्या कोटींचे नुकसान

1 min read

भारतात पबजी बंद, कंपनीचे इतक्या कोटींचे नुकसान

चीनकडून सर्वाधिक महसूल दुसरीकडे, जर आपण महसूलबद्दल बोललो तर जास्तीत जास्त म्हणजेच 52% महसूल चीनमधून येत आहे. अमेरिकेतून 14 टक्के आणि जपानमधील 5.6 टक्के.

भारत सरकारने बर्‍याच मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात गेमिंग अॅप पासून ते डेटिंग, व्यवसाय आणि इतर प्रकारच्या अॅप्सचा समावेश आहे. पण सर्वत्र चर्चा आहे ती पबजी गेमच्या बंदीची. पबजी गेमची मालकी चीनी कंपनी टेंन्संटच्या मालकीची आहे. भारतातील पबजी गेमचा महसुल पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. पण पबजीवरील बंदीमुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे.
पबजी बंदीमुळे टेंन्सेंटला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच टेंन्संटचे बाजार भांडवल (मार्केट पोजीशन) 2.48 लाख कोटी रुपयांनी खाली आले आहे. ही यंदाची दुसरी मोठी घसरण आहे. ब्लूमबर्गच्या मते, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अॅप वेचॅटवर बंदी घातली तेव्हा कंपनीला 4.81 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
भारतातील बहुतेक वापरकर्ते सन 2018 मध्ये लाँच झालेल्या पबजीचे 2020 पर्यंत भारतात सर्वाधिक वापरकर्ते होते. जगातील एकूण वापरकर्त्यांपैकी भारताचे 24 टक्के वापरकर्ते आहेत. तर चीनकडे 16 टक्के आहेत. अमेरिकेत ही आकडेवारी 6.4 टक्के आहे.
चीनकडून सर्वाधिक महसूल
दुसरीकडे, जर आपण महसूलबद्दल बोललो तर जास्तीत जास्त म्हणजेच 52% महसूल चीनमधून येत आहे. अमेरिकेतून 14 टक्के आणि जपानमधील 5.6 टक्के.
भारतातील गेमिंग स्ट्रीमिंग साइट रुटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष कुमार यांच्या मते, 'भारतात फक्त पबजी गेमचे 1750 दशलक्ष डाऊनलोड आहेत. त्यापैकी 750 लाख सक्रिय वापरकर्ते आहेत. चीनपेक्षा जास्त लोक भारतात पबजी खेळतात. पण कमाईच्या बाबतीत चीन भारतापेक्षा पुढे आहे. कारण पैसे खर्च करून गेम खेळाणा-यांची संख्या कमी आहे.