विजय कुलकर्णी/ परभणी : तहसील कार्यालय परभणी अंतर्गत अवैध रेतीसाठा जप्त केल्याबाबतचा अहवाल सादर केला असून त्याअनुषंगाने बुधवार, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता परभणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुकापुरवाडी गट क्रमांक ७१ मधील जप्त ४२ ब्रास अवैध वाळू साठ्याचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती परभणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली आहे.
जप्त रेती साठ्यातील रेती खरेदीसाठी लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास इच्छुकांनी ६ जानेवारी रोजी अटी व शर्तीच्या अधीन राहून बोली बोलण्यात येईल. सरकारी किमतीच्या एक चर्तुतांश रक्कम लिलाव सुरु होण्यापुर्वी लिलावात भाग घेणाऱ्यांकडुन घेण्यात येईल. लिलाव झालेल्या दिवशी लिलाव धारकांने संपुर्ण रक्कम भरावी लागेल. शासन आदेशानुसार जीएसटी कराचा भरणा करणे बंधनकारक असेल. बोली लावून साठा घेवून संपुर्ण रक्कम भरणा न केल्यास संबंधीतावर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. रेतीसाठा तातडीने त्यांच्या स्वखर्चाने साठवणूक केलेल्या ठिकाणावरुन उचल करावा लागेल.
अपेक्षित रेतीसाठ्याच्या प्रमाणात वाहतूक पासेस लिलावधारकास दिल्या जातील. विहीत कालावधीत साठ्याची उचल न केल्यास फेरलिलाव करण्यात येईल. जशास तशा स्थितीमध्ये रेतीसाठा घ्यावा लागेल. लिलावात भाग घेणाऱ्यांकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, टॅनकार्ड असणे आवश्यक आहे. लिलावधारकाने गौण खनिज विकास प्रतिष्ठाणची १० टक्के रक्कम जमा करावी लागेल. कार्यालयाच्या दर्शविलेल्या पत्त्यावर लिलावात बोली बोलणार्यांची जबाबदारी राहील. लिलाव अंशत: अथवा पुर्णत: रद्द करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकारी यांचे राहतील. वाळू साठ्याची रक्कम भरणा केल्यानंतर ३ दिवसात रेती वाहतुक पासेसकरीता जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांच्याकडून वाहतुक पासेस हस्तगत करावेत.

कोविड-१९च्या प्रार्दुभावामुळे स्वत: मास्कचे परिधान करुन उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंग नियम पाळावेत. तसेच वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. असे परभणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी कळविले आहे.