सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत!तर योगेश्वरी शुगरने केला रस्ता.

1 min read

सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत!तर योगेश्वरी शुगरने केला रस्ता.

परिसरातील ४० ते ४५ किलोमीटर रस्ते दुरुस्त

परभणी/सिद्धेश्वर गिरी : मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ-पाथरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र गेंड्याचे कातडे पांघरलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असल्याने. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होऊन हानी झाल्याचे अनेक उदाहरणे देऊनही आणि निवेदनाचा पाऊस पडूनही या विभागाला जाग येत नसल्याने. योगेश्वरी शुगर या खाजगी तत्त्वावरील साखर कारखान्याने परिसरातील मृत रस्त्यांना जिवंत रुप आणत, परिसरातील ४० ते ४५ किलोमीटर रस्ते दुरुस्त करत पडलेल्या पावसामुळे खड्डयात खडी टाकून खडीकरण करुन आपले योगदान दिले आहे.

सदर रस्त्यामुळे परिसरात योगेश्वरी शुगरचे संचालक माजी आ.आर.टी.देशमुख,मॅनेजिंग डायरेक्टर अँड.रोहीत देशमुख यांचे आभार व्यक्त केल्या जात आहेत. परभणी जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या सोनपेठ तालुक्यात जाण्यासाठी पाथरी सोनपेठ या दोन तालुक्याला जोडणारा रस्ता नसल्याने. याठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने व यावर्षीच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतःउखडून गेला आहे. यामुळे चाळीस वर्षांपासून सुरू असणारी औसा-लातूर-सेलू ही बस पहिल्यांदाच बंद झाली होती.

तसेच फसलेल्या वाहनांना ट्रक, जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत जबाबदारी ढकलण्याचा प्रकार केला आहे.यात सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ५४८ बी.हा क्रमांक दिला आहे. मात्र हा क्रमांक देऊन परिसरातील ग्रामस्थांची अपमानजनक स्थिती होतेय का? असा सवाल उपस्थित होत असून रस्ता करण्याची मागणीही जोर धरत असतानाच योगेश्वरी शुगरच्या माध्यमातून करण करण्यात आलेला रस्ता परिसरातील नागरिकांवर आनंददायी क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

रस्त्याचे काम लवकरच चालू होणार:-आर.व्ही.भोपळे
या रस्त्यासाठी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करण्यात येत होता आणि या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच पूर्ण करण्याचा हेतू आमच्या विभागाचा राहील यासाठी जी निविदा प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली असून पावसामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नव्हते.मात्र येत्या दहा ते पंधरा दिवसात या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्गाचे आर.व्ही.भोपळे यांनी दिली.