पुल म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचं 'पुलदैवत'

1 min read

पुल म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचं 'पुलदैवत'

पु ल म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं सुंदर रत्न !!!

जगाच्या पाठीवर असं एकही मराठी साक्षर घर सापडणार नाही जिथं पुलंचं साहित्य संग्रही नाही..
'आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. "उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण ''कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं'' हे सांगून जाईल.' असं पु ल आग्रहाने सांगायचे..

पु ल म्हणजे
महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं सुंदर रत्न !!!

पु ल म्हणजे
महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न !!!

पु ल म्हणजे विनोदाची खाण !!!
पु ल म्हणजे सामान्यांची जाण !!!

पु ल म्हणजे एक विचार !!!
पु ल म्हणजे जगण्याचा एक निराळा प्रकार !!!

पु ल म्हणजे आनंदाची पाखरण !!
पु ल म्हणजे जटिल आयुष्याला असलेलं विनोदाचं कोंदण !!

पु ल म्हणजे साहित्याचा सुर्य म्हणा..
ज्याशिवाय मराठीला नाही कणा !!!

अवघ्या महाराष्ट्राचं सर्वात लाडकं व्यक्तिमत्व साहित्यसुर्य लेखक,गायक,संगीतकार, अभिनेते, अभिवाचक,सादरकर्ते अष्टपैलु व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

  • ओम देशमुख