उपमहापौर शेंडगे यांचा राजीनामा

महापालिकेत पदाधिकारी बदलांच्या हालचाली सुरू झाल्या असून उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा सोमवारी राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे.

उपमहापौर शेंडगे यांचा राजीनामा

पुणेः पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. काही दिवसान पासुन शेंडगे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महानगरपालिकेत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला उपमहापौरपद देण्यात येणार आहे. महापालिकेत पदाधिकाऱ्याचे खांदेपालट करायला दोन महिन्यापूर्वी सुरूवात करण्यात आली होती.

सभागृह नेते धीरज घाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला त्याचवेळी शेंडगे यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, शेंडगे यांचा राजीनामा त्या वेळी घेण्यात आला नव्हता. महापालिकेच्या पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याने 'आरपीआय'ला उपमहापौर पद देण्यात येणार आहे. अखेरीस शेंडगे यांनी राजीनामा सोमवारी रात्री पक्षाकडे दिला आहे.

महापालिकेच्या विषय समितींच्या सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती या समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखड्यामुळे शहर सुधारणा समितीवर नियुक्तीसाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ आहे. या वेळी वेगळ्या चेहऱ्याला संधी देऊन आश्चर्याचा धक्का देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.

राजीनामा दिल्या नंतर पक्षातील वरिष्ठांनी या बातमिला दुजोरा दिला आहे. आरपीआयला उपमहापौरपद देण्याची चर्चा पुन्हा सुरू होऊन भाजपाने हे पद आरपीआयला देण्याचा निर्णय गेतला आहे. आरपीआयकडून उपमहापौरपदासाठी कोणाची वर्णी लाणार याची उत्सुकता आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.