पुणे कोणाच्या बापाचं नाही, मनसेच्या धमकीला श्रीमंत कोकाटेचं प्रत्युत्तर

छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका

पुणे कोणाच्या बापाचं नाही, मनसेच्या धमकीला श्रीमंत कोकाटेचं प्रत्युत्तर

पुणे : संभाजी ब्रिगेड आणि मनसेचा वाद पेटण्याची शक्यता दिसत आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही अशी टिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली होती. यावरुन मनसे आता चांगलीच आक्रमक झाली असुन पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांच्या टीकेला लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय. मोरे यांच्या या इशाऱ्याला आता श्रीमंत कोकाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुण्याच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असं जोरदार श्रीमंत गायकवाड यांनी मनसेला दिलाय. राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी १३ जागा जिंकता आल्या. पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावं, असा टोलाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

...नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू, मनसेचा गायकवाडांना इशारा
पुणे : संभाजी ब्रिगेडचे आणि मनसेचा वाद पेटण्याची शक्यता दिसत आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही अशी टिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केली होती. यावरुन मनसे आता चांगलीच आक्रमक झाली असुन पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी लायकीत राहायचं नाहीतर प…
राज ठाकरे राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला माणुस- प्रविण गायकवाड
राज ठाकरेंनी आजोबांच्या लिखाणाचा अभ्यास करावा - गायकवाड

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.