पुण्यातील कारागृहातून दोन कैदी फरार

1 min read

पुण्यातील कारागृहातून दोन कैदी फरार

एका संस्थेच्या इमारतीमध्ये उभारले होते तात्पुरते कारागृह

स्वप्नील कुमावत/पुणे: पुण्यातील येरवाडा कारागृहातील कैद्याना कोरोनाची लागण झाली होती. फिजिकल डिस्टंसिंगसाठी पुण्यात एका खाजगी इमारतीमध्ये तात्पुरते कारागृह उभारण्यात आले होते. या कारागृहातुन दोन कैद्यी पळुन गेले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षद सय्यद आणि आकाश बाबुराव पवार अशी पळुन गेल्याला कैद्यांची नावे आहेत. बराच वेळ हे कैदी दिसत नसल्याने त्यांचा शोध घेतला असता. शनिवारी 13 जून रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास येथून दोन कैदी बाथरूमच्या खिडकीतून बाहेर उडी टाकत पळुन गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करु असे येरवडा पोलिसांनी सांगितले.
यापुर्वी दि 8 जून रोजी औरंगाबाद येथील दोन कैदी कोविड रुग्णालयाच्या खिडकीचे गज वाकवून फरार झाले होते. राज्यातील कैद्याच्या पलायनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राज्यातील पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.