अनिल देशमुखांना धक्का, नरखेड पंचायत समिती भाजपच्या ताब्यात

अनिल देशमुखांना धक्का, नरखेड पंचायत समिती भाजपच्या ताब्यात

नागपुर : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल याला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी गृमंत्री अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नरखेड पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादीच्या हातातून नरखेड पंचायत समितीवर भाजपने विजय मिळवल्याने हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.हे.

अनेक वर्षापासुन नागुरातील नगरखेडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र आता ही पंचायत समिती भाजपाने हिसकावून घेतली आहे. अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यापासून ते गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. अनिल देशमुख आपल्या मतदारसंघातही नसल्याने या निवडणुकीत काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली नरखेड पंचायत समिती भाजपने आपल्याकडे खेचून घेतली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ७९ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती..


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.