प्यार के जुर्म मै रिया चक्रवर्ती गिरफ्तार

1 min read

प्यार के जुर्म मै रिया चक्रवर्ती गिरफ्तार

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक

मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास सूरू असताना. आज मंगळवारी एनसीबीकडून तिला अटक झाली. रिया चक्रवर्ती हिच्यावर ड्रग्स घेण्यासह गंभीर आरोप होते, अशा परिस्थितीत एनसीबी कडून सतत तिची चौकशी सुरू होती. रियाच्या अटकेनंतर आता तिची वैद्यकीय चाचणी व कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज रिया एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी आली होती, त्यानंतर काही तासांनंतर तिचे वैयक्तिक वाहन परत पाठविण्यात आले, त्यानंतर रियाला आज अटक केली जाऊ शकते. अशी अटकळ वर्तवली जात होती. शेवटी रियाला एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे.
रियाला सीबीआय प्रथम अटक करेल असे वाटत होते, परंतु या प्रकरणात ड्रग कनेक्शन आल्यापासून या प्रकरणात एनसीबीची एन्ट्री झाली, ज्यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला प्रथम ड्रग्स खरेदी प्रकरणात अटक केली गेली होती आणि आता रिया चक्रवर्तीला ही अटक करण्यात आली आहे.