माणसांपाठोपाठ पशुधनांवरही क्वारंटाइनची पाळी.

1 min read

माणसांपाठोपाठ पशुधनांवरही क्वारंटाइनची पाळी.

'लंबी' विषाणू बाधेने पशुधन संकटात...

अहमदपूर: आधीच अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना आता पशुधन लंबी विषाणुची बाधा होऊन दगावण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांवरचे संकट आणखीनच गडद झाले आहे. अहमदपूर तालुका परिसरात पशुधनामध्ये लंबी साथरोगाची लागण होत असल्याचे दिसून आले असून या विषाणुची बाधा होऊन पशुधन अचानकपणे गंभीर आजारी पड़त आहेत. या गंभीर आजारात पशुधनामध्ये खुपच अशक्तपणा येतो. त्यातच पशुधन दगावते. कोरोनामुळे माणसे अलगीकरण जात आहेत, तद्वतच सध्या अहमदपूर परिसरात सुरु असलेल्या लंबी साथरोगात पशुधनावरही अलगीकरणाची पाळी ओढवली आहे.
या साथरोगाला बळी पडलेल्या पशुधनाची पाहणी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज केली. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी. पशुधनामध्ये स्वच्छता पाळावी. लंबी विषाणुची बाधा झाल्यास पशुधन अलग अलग ठेवावे, असे आवाहन केले.