जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लसीकरण केंद्रांवर रांगा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लसीकरण केंद्रांवर रांगा

औरंगाबाद- जिल्ह्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जनजागृतीसाठी नविन आदेश काढला आहे.लसीचा एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, राशन, गॅस मिळणार नसल्याचे या आदेशात नमुद केले आहे. या आदेशाचे परिणाम बुधवारी शहरात चांगलेच दिसून आले.लसीकरणासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला मिळणारा अल्प प्रतिसाद आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लसीकरणामुळे कमी करता येईल य़ा हेतूने लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री नविन आदेश जारी केले. आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स,पर्मनंट लायसन्स,अशा कामकाजासाठी येणाऱ्यांना किमान एक डोस पुर्ण असावा अशी सक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा प्रतिसाद कमी पाहायला मिळत होता.मात्र नविन नियमाने लसीकरणाचा प्रतिसाद चांगलाच वाढला आहे.आणि आगामी काळात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या आणखी वाढली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.