भा.रा तांबे यांना राजकवी म्हटले जाते.जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिल कार्य काय ही कविता आपण सगळेच ओळखतो. अगदी कोणाचे कोणावाचून कांही अडत नाही हे सांगताना या दोन ओळी तरी नक्कीच आपल्या ओठावर येतात.
रामकृष्णही आले गेले। त्याविन जग का ओसची पडले।
मी जाता राहिल कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय
तांबेची ही कविता जीवनाचा खरा अर्थ सांगून जाते. पण अशा अनेक कविता भा.रा. तांबे यांनी रचल्या आहेत. त्यातील दोन कविता आणि भा. रा. तांबे यांची मला असलेली ओळख मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
पहिली कविता बघुयात
पिवळे तांबूस उन कोवळे पसरे चौफेर
ओढा, नेई सोने वाटे, वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकूट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साशीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालिचे
सोनेरी, मखमली, रूपेरी पंख कितिकांचे
रंग किती वर तर-हे त-हेचे इंद्रघनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे फुले, साळीस जणू फुलती
साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती
झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे, माणके, पाचू फुटूनू पंखची गरगरती
पहा पाखरे चरोनी झाडावर गोळा
कुठे बुडला पलीकडील तो सोन्याचा गोळा
भा. रा. तांबे
(ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७ १९४१)
अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी होते. ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते अगदी निर्वाणाच्या तयारीला लागले होते. गंमत बघा याचवेळी त्यांचे एक मित्र त्यांच्यापाशी कविता लिहिण्याची विनंती करत होते. लागले. तांबेंनी आयुष्याच्या या वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनंती केली. आठवणीचे पत्र देखील पाठवले. विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या मित्रास पाठवली होती.
मधु मागसी माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी !
आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या, दया करी.
नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी.
तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !
ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरीं.
राजकवीची ओळख
राजकवी भा. रा. तांबे यांच्या कविता सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांची नववधु वृत्तातील रचना देखील सर्वांना परिचित असते. भा. रा. तांबे यांना राजकवी का म्हणतात. आणि मित्राच्या आग्रहाखातर पोस्टकार्डवर लिहिलेली त्यांची शेवटची कविता कोणती

Loading...