मानधनासाठी शिपायाने घातला ग्रामपंच्यातीत राडा

औराद शा.पोलिस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानधनासाठी शिपायाने घातला ग्रामपंच्यातीत राडा

निलंगा/प्रतिनिधी : ग्रामसेवकाने मानधन न दिल्याने शिपायाने तगरखेडा ग्रामपंचायत व ग्रामसेवकावकाच्या अंगावर शेन मारून दगडफेक केली असल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील ग्रामपंचायत शिपाई शिवाजी कांबळे अनुसया कांबळे या दोघांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच केवळबाई सुर्यवंशी व ग्रामसेवक एस.एच.गिरी यांच्या अंगावर शेन मारण्यासाठी गेले असता सरपंच महिलेचा मुलगा रणजित सुर्यवंशी याने आडविले असता शिपाई व त्याच्या पत्नीने त्याच्याच अंगावर शेन मारले व त्यास लाथा बुक्यानी मारहाण केली व ग्रामसेवकासही अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या प्रयत्नाने दगडफेक केली आणि संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालयात शेन मारून दगडफेक केली व धिंगाणा घातला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला असा गुन्हा औराद शा.पोलिस ठिण्यात दाखल करण्यात आला आहे.

२०१३ पासून संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी हा सदरील कार्यालयात कामावर नाही.त्याला ग्रामपंचायतने कामावरून कमी केले आहे.ब-याच वर्षापासून सदरील शिपाई हा तगरखेडा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होता परंतु काही कारणास्तव त्यास आठ वर्षापूर्वी ग्रामपंचायतने कामावरून कमी केले आहे.संबंधित शिपाई शिवाजी कांबळे यानी लेबर कोर्टात केस लढत आहेत माञ अध्याप निकाल लागला नाही.ग्रामपंचायत व संबंधित कर्मचारी यांच्या मानधनाचा काहीही संबध नाही माञ दिनांक २० रोजी ११.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात जावून शिवाजी कांबळे व त्याच्या पत्नी अनुसया कांबळे या दोघांनी दगडफेक करून कार्यालयात दगडफेक केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.असे जर होत असेल तर ग्रामसेवक कर्मचाऱ्यांना संरक्षण कोण देणार असा सवाल जणता करत आहे.

पोलिसांनी मध्यस्थी करून संपूर्ण प्रकरण सोडवले परंतु सरपंचाचा मुलगा रणजित कांबळे यांना दोघा पती पत्नीने शर्टाला धरून मारहाण केली आहे.हा व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.