राहुल गांधींच्या गळ्यात पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची माळ

1 min read

राहुल गांधींच्या गळ्यात पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची माळ

खासदार राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करण्याच्या मागणीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रस्ताव मांडला.

नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याच्या मागणीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर देण्यात आला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या बैठकीत राहुल गांधीकडे पक्षाची धुरा सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला. दुसरीकडे काँग्रेसने सीडब्ल्यूसाच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही राहुल गांधी योग्य वेळी निर्णय घेतील असे काँग्रेसचे राष्ट्रीय मिडीया प्रभारी रणदीप सुरेजवाला यांनी सांगितले. यावर राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी नकारही दिलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष होतील याबाबत अटकळ बांधली जात आहे.

2017 च्या अखेरीस काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तातडीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दो महिने त्यांची मनधरणी करण्यात आली. परंतु यात यश न आल्याने ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र तेव्हापासून अनेक वेळा पक्षातून राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवावं अशी मागणी होत आहे. राहुन गांधी पक्षाचे अध्यक्ष नसले तरी ते सरकारच्या धोरणावर सतत टीका करतात. ते पक्षाची धुरा पुढे नेवु शकता त्यामुळे त्यांना अध्यक्ष बनवा असी मागणी होत आहे.