परभणीत जुगार अड्ड्यावर छापा, लाखोंचा ऐवज जप्त

1 min read

परभणीत जुगार अड्ड्यावर छापा, लाखोंचा ऐवज जप्त

शिवरामनगरातील एका घरात जुगार खेळत असलेल्या सात जणांना अटक करत नगदी २ लाख १८ हजार ५२० रुपयांसह एकूण 3 लाख ४८ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

विजय कुलकर्णी / परभणी - पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवार (दि.१९) रोजी रात्री शिवरामनगरातील एका घरात जुगार खेळत असलेल्या सात जणांना अटक करत नगदी २ लाख १८ हजार ५२० रुपयांसह एकूण 3 लाख ४८ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
शिवरामनगरातील काकडे यांच्या घरात काहीजण पैश्यांवर झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुरुवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी राहूल चिंचाणे, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, शंकर गायकवाड, दीपक मुदिराज आदींनी मिळालेल्या माहितीवरून शिवरामनगरातील काकडे यांच्या घरी छापा मारला. त्यावेळी तेथे काही जण पैश्यांवर जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पथकातील अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सातही जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील नगदी २ लाख १८ हजार ५२० रुपये, तसेच १ लाख ३० हजार रुपयांचे मोबाईलही यावेळी जप्त केले. असा एकूण 3 लाख ४८ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी राहूल चिंचाणे यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार श्रीधर वाघमारे हे करीत आहेत.