देवभूमी उत्तराखंडमध्ये पावसाचा रौद्ररुप , ४७ जणांचा मृत्यू

नाशिकचे 27 यात्रेकरु नैनितालला अडकले आहेत.

देवभूमी उत्तराखंडमध्ये पावसाचा रौद्ररुप , ४७ जणांचा मृत्यू

उत्तराखंडः उत्तराखंडमध्ये गेल्या दोन -तीन दिवसान पासुन पावसाने रौद्ररुप धारण केला आहे. सलग मुसळधार पाऊस कोसळत असल्या मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या महापुरामुळे आतापर्यंत एकूण ४७ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये रस्त्यांवरून नद्या वाहत असल्याचे चित्र आहे. तर नद्यांना मोठा पूर आला आहे. चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नदीला पूर आल्याने बांधकाम सुरू असलेला पूलही वाहून गेला आहे मंगळवारी एकाच दिवसात ४२ लोकांचा मृत्यू झाला असून बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याचे सांगण्यात येतेय. एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांनी जानकी चट्टी येथून भाविकांना रात्री उशिरा सुरक्षित गौरीकुंडमध्ये पोहोचवण्यात आले. केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना हे भाविक अडकले होते. पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला होता. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या पलिकडे अडकलेल्या अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मुसळधार पावसात एसडीआरएफने आतापर्यंत २२ भाविकांना वाचवले आहे. चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे.

नाशिकचे २७ यात्रेकरु नैनितालला अडकले आहेत. त्यांनी नैनितालमधील भीषण परिस्थितीचा ‘आँखो देखा हाल’ नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लगोलग नैनिताल प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याची नैनिताल प्रशासनानने व्यवस्था केली. पर्यटकांची काळजी घेऊ, त्यांना लागेल ती मदत करु, असे नैनिताल प्रशासनाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.