राज ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना लसी बाबत पत्र

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत.

राज ठाकरेंचे थेट पंतप्रधानांना लसी बाबत पत्र

मुंबईः कोरोनाचा प्रदुर्भाव झपाट्याने वाढला आहे. रुग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत.

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कोव्हीड-१९ ची साथ सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात, निव्वळ आकड्यांमधे मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. आज सारा देश कोव्हीड-१९च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट आहे. असे त्यांनी पत्रात म्हटले.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. तसेच या पत्रातून पंतप्रधानांकडे पाच मागण्याही करण्यात आल्या आहेत.

राज ठाकरेंनी केलेल्या मागण्या

  • महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या;

  • राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात;

  • “सिरम'ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी;

  • लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हॉफकिन व हिंदुस्तान अंटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी; आणि

  • कोव्हिड-१९ रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेस पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.