राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना पत्र, केले मदतीचे आवाहन...

महाराष्ट्र सध्या संकटात आहे. ह्या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांनी जितकं जमेल तितकी मदत पूरग्रस्तांना करावी

राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना पत्र, केले मदतीचे आवाहन...

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिमुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक दुर्घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी पुढे यावं, तातडीने जशी जमेल तशी मदत करावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…
महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे.

ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी.

महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.

जय महाराष्ट्र !

राज ठाकरे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.