राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही- निलेश राणे

राजे, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका.

राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही- निलेश राणे

मुंबई: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण रद्द झाले, त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे .यानंतर मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी सोमवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचा दौरा सुरू केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांनी राज्याचा दौऱ्याला प्रारंभ केला.

आरक्षणाच्या प्रश्नाबाबत त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत संभाजीराजे यांनी मोठे विधान केले आहे. यातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागलं आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच, संभाजीराजेंच्या भूमिकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली असून त्यांच्यावर आरोप केले आहेत.

प्रसार माध्यमांशी बोलतांना  ' मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. तुम्हाला जर पवार साहेब व महाविकास आघाडीसोबत हितसंबंध जपायचे असेल तर खुशाल जपा जायचं असेल, तर मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.' असे विधान करत राणेंनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.