रजनीकांत यांचा राजकारणाचा प्रवास थांबला

भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही - रजनीकांत

रजनीकांत यांचा राजकारणाचा प्रवास थांबला

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला आहे. राजकारणात येण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे सांगत त्यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ (RMM) पक्ष विसर्जनाची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे.

रजनी मक्कल मंद्रम’ हा संपूर्ण पक्ष विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे हा पक्ष कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. मी राजकारणात येणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

'मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याचा विचार केला होता. परंतु वेळ अशी होती की हे शक्य झालं नाही. भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे रजनी मक्कल मंद्रम हे लोकांच्या हितासाठी फॅन चॅरिटी फोरम म्हणून काम करेल', असं रजनीकांत यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.