राजीव गांधींचे राम मंदिरासाठी योगदान – स्रुबमण्यम स्वामी

1 min read

राजीव गांधींचे राम मंदिरासाठी योगदान – स्रुबमण्यम स्वामी

“पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झालं तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच नाव घ्यावं लागेल”

Analyser Team/नवी दिल्ली : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होत आहे. आयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. दरम्यान भाजपाचे राज्यसभा खासदार स्रुबमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. “पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झालं तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच नाव घ्यावं लागेल”
स्रुबमण्यम स्वामी यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील “पंतप्रधान मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झालं तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच नाव घ्याव लागेल” अस विधान त्यांनी केलं आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, राम मंदिरामध्ये पंतप्रधानांच कोणतंही योगदान नाही त्यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, त्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे.
राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंगल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली आहे. अशोक सिंगल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती. असे व्यक्तव्य स्वामी यांनी केल आहे.
राम सेतूना राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान मोदी यांच्या टेबलवर गेल्या ५ वर्षापासून पडून आहे. मात्र, त्यांनी आजवर यावर स्वाक्षरही केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. मात्र, मला वाईट वाटतंय की आमच्या पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे. असंही स्वामी यांनी म्हटले आहे.