माविआकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

माविआकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबईः काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर ही निवडणूक महाविकास आघाडीचं जिंकेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. तर एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

**रजनी पाटील कोण आहेत **-
रजनी पाटील ह्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता जम्मू आणि काश्मीरच्या त्या काँग्रेस प्रभारी आहेत. ठाकरे सरकारनं ज्या १२ नेत्यांची नाव विधान परिषदेवर घेण्यासाठी राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. त्यात काँग्रेसनं रजनी पाटील यांचंही नाव दिलेलं आहे. १९९६ साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारणाची सुरुवात त्यांनी जिल्हा परिषदेतून केलेली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.