राजू शेट्टींचा लसीबदल मोदींना इशारा

सीरम इन्स्टिट्यूटमधून एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही,राजू शेट्टींचा मोदींना इशारा

राजू शेट्टींचा लसीबदल मोदींना इशारा

कोल्हापुरः महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकानी लसिकरण बंद करण्यात आले आहे. लसींच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य असा संघर्ष तापायला सुरुवात झाली आहे. राज्याला गरज असताना केंद्राकडून पुरेशी लस पुरवली जात नसल्याचा राज्य सरकारचा आक्षेप आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोना लसी घेऊन जाणारी एकही गाडी बाहेर पडून देणार नाही, असा इशारा ट्टिटच्या माध्यमातून दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि गृहमंत्र्यांना पत्रही लिहले आहे. आठवडाभरात महाराष्ट्रातील कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.'सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही.'असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदींना दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.