राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार तर मेहता मुख्यमंत्र्याचे सल्लागार

1 min read

राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार तर मेहता मुख्यमंत्र्याचे सल्लागार

अजय मेहता

मुंबई: अजय मेहता यांची मुख्य सचिवपदाची मुदत 30 जुन रोजी संपत आहे. तर गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. अजय मेहता यांना मुदत वाढ दिली जाईल अशी चर्चा होती.मात्र त्यांना मुदत वाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.अजय मेहता हे मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार असतील.

Sanjay-Kumar-1
कोण आहेत संजय कुमार

  1. 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  2. जुन 1992 ते 1997 दरम्यान बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद चे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
  3. औरंगाबादचे विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
  4. 2016 पासून गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
  5. संजय कुमार हे 28 फेब्रुवारी 2021 रोजा सेवानिवृत्त होतील .
  6. मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ आठ महिन्यांचा असेल.