राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97 हजारांच्या वर

1 min read

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97 हजारांच्या वर

1561 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले.

स्वप्नील कुमावत:महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी विक्रमी 3 हजार 607 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळुन आले आहेत. एका दिवसात एवढ्या मोठा प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने प्रशासन चिंतेत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97 हजार 648 एवढी झाली आहे.
गेल्या 24 तासांत 151 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3590 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात 1561 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहे. राज्यात एकूण 46 हजार 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 47 हजार 968 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकट्या मुंबईत मागील दोन दिवसांत 194 रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी 97 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी देखील 97 रुग्णांचा बळी गेला.
कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत 1952 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 1540 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. यासोबत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 53 हजार 985 वर गेली आहे.