सिध्देश्वर गिरी /सोनपेठ: राज्यातील शिक्षक बदली प्रक्रियाबाबत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने नुकतीच त्रुट्या दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरी कान्हेंगावकर यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या व जिल्हाअंतर्गत बदल्याची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत राबवणार असल्याचे शासन परिपत्रकात सांगितलेले आहे.मात्र सदर आदेश १५ जुलै रोजी निर्गमित करण्यात आल्याने कालावधी कमी दिवसाचा असल्याचे स्पष्ट जाणवते.

त्याचबरोबर शिक्षक बदली १५% समुपदेशन प्रक्रिया राबवताना २०१८-१९मध्ये बदल्यात विस्थापित झालेले पती-पत्नी,महिला शिक्षिका,सर्व शिक्षक यांना प्राधान्याने गतवर्षीच्या शाळा संच मान्यतेनुसार रिक्त व सामान्यीकरणात झाकून ठेवलेल्या सर्व जागा ओपन करून राज्यातील अन्यायग्रस्त सर्व विस्थापित यांच्या विनंतीनुसार त्यांना बदलीने पोस्टिंग देण्यात यावी.बदलीची पोस्टिंग देत असताना सध्या कार्यरत शिक्षकावर अन्याय होणार नाही.याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.अशा आशयाचे शुद्धीपत्रक काढून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सदरचे शुद्धिपत्रक देण्यात यावे.अशी मागणी करण्यात आलेली आहे हे करत असताना शिक्षक विनंतीनुसार किंवा विशेष बाब म्हणून बदली करू इच्छित असेल तर अशा शिक्षकांना देखील विनंतीनुसार बदलीने पदस्थापना करण्यात यावी.जेणेकरून
२०१८-१९ च्या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देत असताना दोन्हीवरही अन्याय होणार नाही.ही प्रक्रिया मागील पंधरा वर्षासारखी समुपदेशन पद्धतीने राबवल्याने पारदर्शकपणा टिकून राहील व मानवी हस्तक्षेप होणार नाही.यासोबतच राजकीय हस्तक्षेप राहणार नाही.राज्यातील शिक्षकांना अंतर्गत राजकारण्यांमुळे फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून यात आर्थिक घालमेल आणि घोळ कायम असल्याने शिक्षकांना न्याय देणे गरजेचे असल्याचे मत कान्हेंगावकर यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.