राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा तब्बल इतक्या लोकांनी लाईव्ह बघितला.

1 min read

राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा तब्बल इतक्या लोकांनी लाईव्ह बघितला.

भूमीपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

5 ऑगस्टला राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचं सर्व माध्यमांवर लाईव्ह प्रसारण सुरू होत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाल्यापासून ते पुढे, त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले ,पुजा, आरती केली. त्यानंतर त्यांनी रामल्लाचे दंडवत घेऊन दर्शन घेतले. परिसरात वृक्षारोपण केले व भूमीपूजन सोहळा समारंभात सहभागी झाले. भूमीपूजन सोहळा मंत्रोच्चाराच्या गजरात, मोठ्या थाटामाटात पार पडला. हाच सोहळा तब्बल 16 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला असा प्रसारभारतीचा प्राथमिक अंदाज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक हा सोहळा बघत होते.
कोरोनामुळे काही निमंत्रित मंडळीची या सोहळ्याला उपस्थिती होती.