राम मंदिराच्या 2 हजार फूट खाली ठेवली जाणार ही 'वस्तू '

1 min read

राम मंदिराच्या 2 हजार फूट खाली ठेवली जाणार ही 'वस्तू '

भविष्यात होणार फायदा.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उभारणीची तयारी सुरु आहे. 5 ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर निर्माण कार्याच भूमिपूजन होणार.
त्यानंतर मंदिर बांधकामाला सुरु होणार आहे. भव्य -दिव्य अशी राममंदिराची उभारणी असणार आहे. या राम मंदिराच्या 2 हजार फूट खाली एक 'टाइम कॅप्सूल ' ठेवली जाणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रातील सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिली आहे.
काय आहे ही 'टाइम कॅप्सुल '
भविष्यात एखाद्या व्यक्तीला राम मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला राम जन्मभूमीचा पूर्ण तपशील मिळेल. यासाठी ही टाइम कॅप्सुल महत्वाची ठरणार आहे.
5 ऑगस्ट ला 40 किलो वजनाची चांदीची वीट ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करतील. अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट ने दिली आहे.