पंढरपूर : राज्यातील वारकऱ्यांच श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी कोरोनामुळे शुक्रवारी दि. 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांना कोरोनाची लागण झाली होती. अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
रामदास महाराज जाधव ( कैकाडी) हे मूळ अहमदनगर येथील होते. वारकरी संप्रदायात त्यांना मानाचं स्थान होतं. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. रामदास महाराज हे कैकाडी महाराजांचे पुतणे होतं. तेच कैकाडी मठाचं व्यवस्थापन पाहत होते. विशेष म्हणजे रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगतय मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.