रामदास पाटील कम बॅक

1 min read

रामदास पाटील कम बॅक

जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून होणार रुजू

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: हिंगोली नगरपालिकेचे तडफदार मुख्याधिकारी म्हणून ज्यांनी कार्यकाळ गाजवला असे  मुख्याधिकारी रामदास पाटील यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने या बदली मध्ये बदल करून त्यांची हिंगोली येथे प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
हिंगोली नगरपरिषद अंतर्गत मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रामदास पाटील यांनी शहरातील विविध विकास कामांना गती दिली होती. त्यानंतर अचानक त्यांची मुंबई येथे बदली करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु त्यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी हिंगोली नागरिकांच्या वतीने व पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने विचार करून त्यांची हिंगोली प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा आदेश आज जारी केला. या बातमीमुळे हिंगोलीकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.