रमेश पोकळे बंडखोरी करणार?

1 min read

रमेश पोकळे बंडखोरी करणार?

भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरीचे निशाण फडकवल्याने नमनालाच अपशकुन झाला आहे. श्रीकांत जोशी शिरिष बोराळकर आणि सतिश पत्की यांच्या करिता माघार घेणा-या पोकळेना पुन्हा एकदा बोराळकर यांच्यासाठी डावलण्यात आले आहे.

रमेश पोकळे बंडखोरी करणार?
भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारीणी सदस्य रमेश पोकळे यांनी औरंगाबाद पदविधर विधानपरिषद मतदारसंघातून रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज भरायचा निर्धार व्यक्त करत बंडखोरीचे निशाण फडकवले आहे.
रमेश पोकळे यांनी भारतीय जनता पक्षाला विधानपरिषदेची उमेदवारी वारंवार मागितली आहे. पदविधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी पोकळे आग्रही होते. पदविधरसाठी या आधी तीन टर्म तर सिक्षक मतदारसंघासाठी दोन टर्म त्यांनी प्रयत्न केले आहेत. या आधी श्रीकांत जोशी, शिरीष बोराळकर आणि सतिश पत्की यांच्या करता रमेश पोकळे यांना शांत करण्यात आले होते. रमेश पोकळे यांनी प्रत्येक वेळा माघार घेत भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी देखील परत एकदा शिरीष बोराळकर यांची उमेदवारी नक्की झाल्यामुळे रमेश पोकळे यांना संधी मिळालेली नाही. त्यांनी उघडपणे बंडखोरीची भाषा करत स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसात कार्यकर्ते आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून ते उमेदवारी अर्ज ठेवायचा की नाही याबाबत अंतीम निर्णय घेणार आहेत.
तिकडे लातूर येथील अभाविपचे कार्यकर्ते विवेकांनद उजळंबकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करत खळबळ उडवून दिली आहे. उजळंबकर हे वकील असल्याने आणि त्यांनी वकिलांची मोठी नोंदणी केलेली आहे. शिवाय ब्राह्मण जातीचे जवळपास ४५ हजार मतदान आहे. यामुळे उजळंबकर देखील कार्यकर्ता म्हणून मोठे मतदान घेऊ शकतात.
या दोघांची उमेदवारी भाजपसाठी चिंतेचा विषय ठरणारी असेल. रमेश पोकळे यांनी उमेदवारी बाबत निर्णय घेताना पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे का? हे देखीस समजून घेणे आवश्यक आहे. सतत पक्ष डावलत असल्याची भावना रमेश पोकळे यांच्या मनात आहे.