राणे म्हणाले, अटकेचे आदेश काढायला तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान?; पोलीस आयुक्तांचं उत्तर

पोलीस आयुक्तांनी समजून सांगितली कायदेशीर प्रक्रिया...

राणे म्हणाले, अटकेचे आदेश काढायला तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान?; पोलीस आयुक्तांचं उत्तर

नाशिक: नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी अनुद्गार काढले होते. त्यानंतर राज्यभरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवर नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत महाड, रायगड, औरंगाबाद, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

यावर बोलताना राणे म्हणाले, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी अटकेचे आदेश काढायला ते राष्ट्रपती आहे की पंतप्रधान अशी विचारणा राणेंनी केली. त्यावर नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सविस्तर कायदेशीर प्रक्रिया सांगितली. संविधानानुसार गुन्हेगारी कायद्यांतर्गात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना वगळता अटकेची कारवाई करता येते.

नाशिक पोलीस आयुक्त म्हणाले...
विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांसह मोठ्या समुहाची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.

राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.

गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.

राजकारण तापलं; नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल
अटकेसाठी पोलीस पथक रवाना, चिपळूणमध्ये सेना-भाजप आमनेसामने...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.